रावेर शहरातून चोरट्यांनी ट्रक लांबवला


रावेर- शहरातील सावदा रस्त्यावरून टाटा कंपनीच्या ट्रकची चोरट्यांनी चोरी केल्याने शहरातील ट्रान्सपोर्ट व्यावसायीकांसह ट्रक मालकांमध्ये भीती पसरली आहे. शहरातील सावदा रोडवरील महाजन हॉस्पिटलजवळ 2010 चे मॉडेल असलेला टाटा कंपनीचा व पांढर्‍या रंगाची कॅबिन असलेला ट्रक (क्रमांक एम.एच.19 सी.वाय 2603) ट्रक असताना सोमवारच्या मध्यरात्रीनंतर 27 च्या दिड वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने हा ट्रक लांबवला. या प्रकरणी शे.एजाज शे.फयाज (रा.इमामवाडा, रावेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


कॉपी करू नका.