भुसावळात माजी सैनिकाकडे लाखाची घरफोडी


भुसावळ- शहरातील हुडको कॉलनीतील रहिवासी असलेल्या माजी सैनिकाच्या घरातून चोरट्यांनी लाखांच्या ऐवजावर डल्ला मारल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. प्रकाश तायडे हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले. तायडे यांचे व्याही यांनी मंगळवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा पाहून डोकावले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर व पोलिस कर्मचार्‍यांनी घराची पाहणी केली. प्रकाश तायडे हे माजी सैनिक असून चोरट्यांनी एलसीडी टिव्ही, मंगळसूत्र, चांदीच्या लहान मुलांच्या वस्तू आणि आठ हजार रुपये रोख असा सुमारे एक लाखांच्या ऐवजावर डल्ला मारला.


कॉपी करू नका.