रेल्वेत चढताना पाय घसरून पडल्याने शिरसोलीच्या महिलेचा मृत्यू


मलकापूर रेल्वे स्थानकावरील दुर्दैवी घटना

जळगाव- मलकापूर स्थानकावर रेल्वेत चढताना घसरुन पडल्याने मेहरुण बी.शेख ईस्माईल पिंजारी (50, रा.शिरसोली) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना 26 रोजी घडली. मेहरुण बी.शेख ईस्माईल पिंजारी या खाजगी कामानिमित्ताने मलकापूरला गेल्या होत्या. 26 रोजी पुन्हा शिरसोली येथे परतण्यासाठी त्या मलकापूर स्थानकावर आल्या असता अमरावती-सुरत एक्स्प्रेसमध्ये चढताना त्यांचा पाय निसटल्याने त्या रेल्वे स्थानकावर खाली पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर गंभीर अवस्थेत त्यांना मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले त्यानंतर बुलढाणा येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले व पुन्हा तेथून शिरसोली गाव जवळ असल्याने नातेवाईकांनी जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यापूर्वीच रस्त्यात त्यांचे निधन झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रवीण पाटील यांनी मयत घोषित केले.

एमएलसीअभावी पंचनाम्याची अडचण
डॉ.प्रवीण पाटील यांनी मयत महिलेच्या घटनेबाबत जिल्हापेठ पोलिसांना माहिती दिली तर पोलिसांनीही ही घटना मलकापूर रेल्वे स्थानकावरील असून आम्हाला रेल्वे विभागाची एमएलसी मिळालेली नाही त्यामुळे पंचनामा करता येणार नसल्याची अडचण सांगितली. यावेळी पोलिस निरीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्यांना घटना सांगण्यात आल्यानंतर शिवाजी पवार तसेच पोली नाईक दिलीप पाटील यांनी पंचनामा केला. मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.


कॉपी करू नका.