जळगावात वाळू व्यावसायीकावर हल्ला : तिघा आरोपींना कोठडी


जळगाव- वाळू व्यवसाीक अनिल एकनाथ नन्नवरे (27, रा.निमखेडी) 21 रोजी दुपारी 12.15 वाजता दादावाडी स्टॉपजवळील मंदिरासमोर तिघांनी सशस्त्र हल्ला चढवल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी शिरपूर येथून तिघांना अटक केली होती. आरोपींना न्यायालयाने सुरुवातीला पोलिस कोठडी सुनावल्यानंतर मंगळवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेला आठ इंचांचा चाकू जप्त केला आहे.

तिघा आरोपींना वाढीव कोठडी
सुनील एकनाथ नन्नवरे यांच्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल आहे तर या गुन्ह्यात पोलिसांनी शिरपूर शहरातून महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (21), गजेंद्र उर्फ गोल युवराज सुर्यवंशी (20) व विशाल अनिल पाटील (23, रा.खोटेनगर) या तिघांना 22 रोजी अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलीस कोठडी सुरुवातीला सुनावण्यात आल्यानंतर मंगळवारी पुन्हा आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची वाढीव कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. सुप्रिया क्षिरसागर यांनी युक्तीवाद केला.


कॉपी करू नका.