लाच प्रकरण : भुसावळच्या हवालदाराची पोलिस कोठडीत रवानगी


भुसावळ : चारचाकी चालकावर हल्ला केल्याच्या प्रकरणात आरोपीला टार्चर न करण्यासह गुन्ह्यात वापरलेले वाहन सोडण्यासाठी तसेच आरोपी व तक्रारदाराच्या भावावर सरकारी कामात अडथळा न आणल्याच्या कलमाखाली कारवाई टाळण्यासाठी 40 हजारांची लाच मागणार्‍या भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागातील हवालदार छोटू माणिकराव वैद्य (खोटे नगर, जळगाव) यांना जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास जामनेर रोडवरील कल्पना रसवंतीजवळून अटक केली. संशयीत आरोपीला दुसर्‍या दिवशी गुरुवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता न्या.एस.पी.डोरले यांनी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.


कॉपी करू नका.