ट्रकवर चारचाकी आदळल्याने चौघे जण जखमी


चितोडा गावाजवळील घटना ; ट्रकचा टायर फुटल्याने अपघात

यावल- भरधाव ट्रकचा टायर फुटल्याने तो समोरून येणार्‍या चारचाकीवर आदळून झालेल्या अपघातात चौघे जखमी झाले. रविवारी सायंकाळी चितोडा गावाजवळ हा अपघात झाल्याने वाहतूक ठप्प झाली. यावलकडून फैजपूरकडे येणार्‍या ट्रकचे टायर फुटल्याने ट्रक अनियंत्रीत होवून समोरच्या टाटा मॅजिकवर धडकल्याने चालक चंदन सोनवणे (वय 24) तसेच पल्लवी चंदन सोनवणे (वय 21) व त्यांची दोन वर्षांची मुलगी व मुरलीधर ओंकार तायडे (वय 55, रा.डोंगर कठोरा) हे जखमी झाले.


कॉपी करू नका.