भुसावळात महिलेस शिवीगाळ : रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीविरुद्ध गुन्हा

भुसावळ : महिलेस अश्लील शिविगाळ केल्याप्रकरणी रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशीसह दीपक सूर्यवंशी व सोबतच्या अन्य तिघा अनोळखींविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. 27 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तक्रारदार निधी गौरव वाघ (शारदा बिल्डींग, शिवाजी नगर, भुसावळ) व त्यांच्या सासू रेखा वाघ व जेठाणी नेहा नितीन वाघ यांना संशयीत आरोपींनी अश्लील शिवीगाळ करीत फिर्यादीच्या पतीला जिवंत ठार मारण्याची धमकीही दिली. फिर्यादीचे पती गौरव वाघ हे प्रभागात चांगले काम करतात व ते सूर्यवंशीविरुद्ध उभे राहतील या कारणावरून आरोपींनी अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार अनिल अडकमोल करीत आहेत.
