शेतजमिनीसह घरे शासन जमा करण्याच्या आदेशानंतर मांडवेदिगरच्या दोघांचा मृत्यू


मयतात युवकासह वृद्धेचा समावेश ; गावात हळहळ

भुसावळ- तालुक्यातील मांडवेदिगरसह भिलमळी या गावातील सुमारे एक हजारावर हेक्टरील शेतजमीन आणि त्यावरील घरे हस्तांतरीरत करण्यापूर्वी सक्षम प्राधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्यात न आल्याने शेतजमीन व घरे सरकार जमा करण्याचे आदेश प्रांताधिकारी डॉ.श्रीकुमार चिंचकर यांनी काढत दोन्ही गावातील शेतकर्‍यांना काही दिवसांपूर्वी नोटीस बजावल्या होत्या. ही नोटीस मिळताच अजमल सदू पवार (वय 30), सौद्रीबाई मोरसिंग पवार (वय 65) यांचा मृत्यू ओढवला. सौद्रीबाई यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला तर अजमल वार यांना रविवारी नोटीस वाचताना भोवळ आल्यानंतर ते कोसळले व त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशासनाच्या भूमिकेविरुद्ध ग्रामस्थ आता तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.


कॉपी करू नका.
WhatsApp Group