अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; वराडची घटना
बोदवड : तालुक्यातील वराड येथे शुक्रवार, 30 रोजी दुपारी 12.30 सुमारास अल्पवयीन मुलगी शौचास गेल्यानंतर संशयीत आरोपी ईश्वर पाटील (वराड बुद्रुक) याने तरुणीचा विनयभंग केला. यावेळी पीडीतेने आरडा-ओरड करीत आपली सुटका केली तसेच पीडीतेच्या वडिलांना घटना कळताच त्यांनी मक्याच्या शेतात धाव घेत मुलीची सुटका केली. आरोपी ईश्वर पाटीलविरुद्ध बोदवड पोलिसात विनयभंग व पोस्को अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाला असून तपास उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.