मुंबईत संततधार : सहा रेल्वे गाड्या रद्द
चाकरमान्यांची मुंबई पॅसेंजर रद्दने संताप ; 10 गाड्या शॉर्ट टर्मिनेट
भुसावळ- मुंबईत दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आहे. रविवारीदेखील ट्रॅकवर पाणी अडकल्याने अनेक गाड्या विलंबाने धावल्या तर भुसावळ रेल्वे स्थानकावरही अप गीतांजली तब्बल चार तास खोळंबल्याने प्रवाशांनी चांगलाच संताप व्यक्त केला. दरम्यान, सोमवारी मुंबई पॅसेंजर रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांचे चांगलेच हाल होवून त्यांनी संताप व्यक्त केला. मुंबईतील पावसामुळे रविवारी सहा रेल्वे गाड्या रद्द होवून 10 गाड्या शार्ट टर्मिनेट करण्यात आल्या.