घरकुल घोटाळा : माजी मंत्री सुरेश जैनांना तब्बल 100 कोटी दंड व सात वर्ष शिक्षा


माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह 48 संशयीत घरकुल घोटाळ्यात दोषी

जळगाव : राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेतील घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेश जैन व माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना धुळे न्यायालयाच्या न्या.सृष्टी नीळकंठ यांनी तब्बल शंभर कोटी रुपये दंड व सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्या शिवाय प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयूर, मुख्याधिकारी पी.डी.काळे, जगन्नाथ वाणी यांनाही शिक्षा सुनावण्यात आली.

सावळा-गोंधळाने अपहार उघडकीस
झोपडपट्टीत राहणार्‍या लोकांना स्वस्त दरात चांगली घरे देण्यासाठी तत्कालीन नगरपालिकेतील सत्ताधारी गटाने झोपडपट्टी निर्मूलनाच्या उद्देशाने ही योजना राबवण्याचे ठरवले. त्यासाठी हरी विठ्ठलनगर, खंडेरावनगर, समतानगर आणि तांबापुरा या ठिकाणी सुमारे 110 कोटींचे कर्ज काढून 11 हजार घरकुले बांधण्याच्या कामास इ.स. 1999 मध्ये सुरुवात झाली. मात्र या योजनेतील सावळागोंधळ सन 2001 मध्ये समोर आला. सुरुवातीपासूनच अनियमितता, कायद्याचे उल्लंघन, मनमानी पद्धतीने निर्णय, गैरव्यवहार यांचे लचांड उघडकीला आले. पालिकेने घरकुले ज्या जागांवर बांधली, ती जागा पालिकेच्या मालकीची नव्हती. त्यासाठी बिगरशेती परवानगी घेतली गेली नव्हती. सत्ताधार्‍यांनी मर्जीतील खान्देश बिल्डर्सला हे काम दिले. ठेकेदारास विविध सवलती देण्यात आल्या. निविदेतील काम पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराने पाळली नाही. उपरोक्त कामास पाच वर्षांहून अधिक विलंब करणाजया ठेकेदारावर सत्ताधारी गटाने कोणतीही कारवाई केली नाही. याच काळात पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. ठेकेदाराला वारंवार मुदत वाढवून दिली गेली. संबंधिताला बिनव्याजी आगाऊ रक्कम वापरण्याची मुभा दिली गेल्याने पालिका कर्जाच्या खाईत लोटली गेली.

या आरोपींना लागली शिक्षा
प्रदीप रायसोनी, राजेंद्र मयुर, पी.डी.काळे, जगन्नाथ वाणी, माजी मंत्री सुरेश भिकमचंद जैन, माजी मंत्री गुलाबराव बाबुराव देवकर, अशोक काशिनाथ सपकाळे, चुडामण शंकर पाटील, अफजल खान रऊफ खान पटवे, शिवचरण कन्हैयालाल ढंढोरे, आमदार चंद्रकांत बळीराम सोनवणे, सरस्वती रामदास कोळी, चंद्रकांत उर्फ आबासाहेब कापसे, विजय रामदास वाणी, अलका अरविंद राणे, पुष्पा प्रकाश पाटील, डिगंबर दौलत वाणी, लक्ष्मीकांत उर्फ कांती तुकाराम चौधरी, अजय राम जाधव, वासुदेव परशुराम सोनवणे, सुभद्राबाई सुरेश नाईक, इकबालोद्दीन पीरजादे, शांताराम चिंधु सपकाळे, देविदास बळीराम धांडे, अरुण नारायण शिरसाळे, भगतराम रावमल बालाणी, चत्रभुज सोमा सोनवणे, दत्तु देवराम कोळी, डिंगबर दलपत पाटील, कैलास नारायण सोनवणे, अशोक रामदास परदेशी, लिलाधर नथ्थु सरोदे, पांडुरंग रघुनाथ काळे, लता रणजीत भोईटे, मंजुळा धमेंद्र कदम, निर्मला सुर्यकांत भोसले, विमल बुधो पाटील, साधना राधेशाम कोगटा, सुधा पांडुरंग काळे, सिंधु विजय कोल्हे, अलका नितीन लढ्ढा, मुमताजबी हुसेन खान, सुनंदा रमेश छाडेकर, मीना अमृतलाल मंधान, रेखा चत्रभुज सोनवणे, मीना अनिल वाणी, पुष्पलता शालीग्राम अत्तरदे, विजय पंडीतराव कोल्हे, सदाशीव गणपत ढेकळे यांचा समावेश आहे.

सात मयत, एक पसार
घरकुल घोटाळ्यात गुन्हा दाखल असलेल्या एकूण 56 आरोपींपैकी आतापर्यंत महेंद्र तानकु सपकाळे, शालिग्राम मुरलीधर सोनवणे, भागिरथी बुधो सोनवणे, दिलीप पंडीतराव कोल्हे, अर्जुन शिरसाळे, शरद सुकलाल सोनवणे, राजू सोमा सोनवणे हे मयत झाले असून प्रमिला भागवत माळी या पसार आहेत.


कॉपी करू नका.