भुसावळ रोटरी रेल सिटीतर्फे ‘प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव स्पर्धा’
भुसावळ- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी तर्फे भव्य ‘स्व.रो.प्रसन्न देव स्मृती गणेशोत्सव स्पर्धा 2019’ चे आयोजन करण्यात आले आहे. यंदा प्रथमच घरगुती, शालेय व सार्वजनिक मंडळ अश्या तीन गटात ही स्पर्धा पर्यावरण जागृतीसाठी केवळ भुसावळ शहरासाठी घेतली जात आहे.
तीन गटात होणार स्पर्धा
याबाबत रोटरी रेल सिटीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमच्या क्लबच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. सामाजिक बांधीलकी व पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा तीन गटात घेतली जात आहे. गट अ मध्ये घरगुती गणपती सजावट, गट ब मध्ये शालेय गणेशोत्सवातील कल्पकता तर गट क मध्ये सार्वजनिक मंडळांचा सामाजिक संदेश अस स्पर्धेचे स्वरूप असून तीनही गटांना प्रथम, व्दितीय व तृतीय असे पुरस्कार स्वतंत्र देण्यात येणार आहेत. घरगुती गणपती सजावट या गटात भाग घेणार्यांनी आपल्या घरातील सजावटीचे दोन फोटो 9422279621, 9420499919, 9881136143, 9822556675 या पैकी एका मोबाईल क्रमांकावर पाठवावे. तर ब व क गटातील स्पर्धकांनी वरील नंबरवर आपली कल्पकता व संदेश थोडक्यात टाईप करून पाठवावा. यातील परीक्षकांनी निवडलेल्या स्पर्धकांचे परीक्षक प्रत्यक्ष जाऊन परीक्षण करतील व क्रमांक काढतील. फोटो व माहिती पाठविण्याचीअखेरची तारीख गुरुवार, 5 सप्टेंबर आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार, प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी केले आहे.