पोस्कोच्या गुन्ह्यातील संशयीत शहर पोलिसांच्या जाळ्यात

भुसावळ : शहर पोलिस ठाण्यात पोस्कोचा गुन्हा 10 जून रोजी दाखल झाला होता मात्र या गुन्ह्यातील संशयीत आरोपी पिंटू अशोक तोडकर पसार होण्यात यशस्वी झाला होता. संशयीत आरोपी शहरातील नेहरू मैदानाववर आला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मो.वली सैय्यद व बाजारपेठचे सहाय्यक उपनिरीक्षक तस्लीम पठाण यांनी आरोपीस अटक केली.
