नामदार हरीभाऊ जावळेंच्या हस्ते यावल-भुसावळ राज्य मार्गाचे भूमिपूजन
फैजपूर- नामदार हरीभाऊ जावळे यांच्या प्रयत्नाने मंजूर रस्ता कामांचे भूमिपूजन रविवारी करण्यात आले. यावल-भुसावळ राज्यमार्गासह डोणगाव-ईचखेडा-वाघझीरा-वड्री-परसाळे-यावल-अट्रावल-भालोद-आमोदा या 11 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचेही भूमिपूजन झाले. यावल-भुसावळ या राज्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. जावळे यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी मंजूर झाला मंजूर झाला असून रस्त्याचे काम होत असल्याने वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
यांची होती प्रमुख उपस्थिती
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यावल नगराध्यक्षा सुरेखा कोळी, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील, स्वीकृत नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, लोकसभा विस्तारक हर्षल पाटील, भाजप सरचिटणीस विलास चौधरी, तालुकाध्यक्ष डॉ.नरेंद्र कोल्हे, सरचिटणीस उज्जैनसिंह राजपूत, जिल्हा परीषद सदस्य सविता भालेराव, सुनंदा सपकाळे, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी मोरे, शहराध्यक्ष बाळू फेगडे, उमेश फेगडे, ज्येष्ठ पदाधिकारी वसंतराव भोसले, रामराव देशमुख, शिरीष देशमुख, प्रमोद नेमाडे, रमेश देशमुख,नारायणबापू चौधरी, डॉ.निलेश गढे, किशोर कुलकर्णी, राकेश फेगडे, धीरज महाजन, गणेश महाजन, किरण चौधरी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्यने यावेळी उपस्थित होते.