रुक्मिणी फाउंडेशनतर्फे यंदाही शिक्षक व विद्यार्थ्यांचा गुणगौरव


वरणगाव- शहरातील रुक्मिणी फाउंडेशनतर्फे गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही शिक्षक दिनाचे औचित्य साधून शिक्षकांना गुरुरत्न पुरस्कार तर विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. शिक्षकी पेशात कार्यरत असताना अध्ययन-अध्यापनात केलेले उल्लेखनीय काम, विद्यार्थ्यांसाठी राबवलेले विविध उपक्रम, विद्यार्थी संख्येत वाढ, शाळेच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न यासह विविध निकषांच्या आधारे आदर्श शिक्षकांची निवड करण्याकरिता निवड समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती लवकरच आदर्श शिक्षकांची निवड कोणताही प्रस्ताव न मागवता करणार आहे. त्यानंतर निवड झालेल्या शिक्षकांना गुरुरत्न पुरस्कार 2019 मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र प्रदान करण्यात येईल. वरणगाव शहरातील प्रत्येक शाळा व महाविद्यालयातील दहावी आणि बारावी इयत्तेत प्रथम, द्वितीय व तृतीय अशा विद्यार्थ्यांना गौरवचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिली.


कॉपी करू नका.