विजेच्या धक्याने नंदगावच्या तरुणीचा मृत्यू


जळगाव : पूजेरी तयारी करत असतांना विजेचा धक्का लागल्याने ममता बलदेव पाटील (19, रा.नंदगाव, ता.जळगाव) या तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी 10 वाजता येथे घडली. बलदेव केशव पाटील हे पत्नी वंदना, मुलगा सनीराज व दुसरा मुलगा राज असे सर्व जर रविवारी सकाळीच शेतात गेल्यानंतर शेजारीच राहणारी चुलत बहीण धनश्री ही हरतालिकेच्या पूजेसाठी ममताला बोलवायला गेल्यानंतर ममता त्यापूर्वीच विजेचा धक्का लागलयाने जमिनीवर कोसळली होती. ममता लागलीच जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी वैद्यकिय अधिकार्‍यांनी ममताला मृत घोषीत केले. शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


कॉपी करू नका.