जळगावात होमगार्डशी अरेरावी : एक अटकेत दुसरा पसार


जळगाव- होमगार्डशी अरेरावी करीत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा आणणार्‍या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली तर दुसरा मात्र पसार झाला. उमेश जयवंतराव पाटील (रा.तरसोद) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याचा साथीदार राहुल पाटील (जळगाव) पसार झाला आहे.

होमगार्डशी अरेरावी भोवली : दोघांविरुद्ध गुन्हा
अजिंठा चौफलीवर वाहतूक सुरळीत करण्यासह बंदोबस्तासाठी एमआयडीसीच्या पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, दादासाहेब वाघ, राजू राणे, कृष्णा पाटील, विनोद बोरसे, राजेंद्र ठाकूर यांच्यासह होमगार्ड मनोज कोळी व कर्मचारी तैनात असताना सोमवारी दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास अजिंठा चौफुलीकडून ऑटो आयकॉनचे कर्मचारी ढोल-ताशांसह गुलालाची उधळण करीत मिरवणूक नेत असताना होमगार्ड मनोज कोळी यांनी वाहतुकीची कोंडी होत असून काही अंतरावरुन मिरवणूक काढा तसेच गुलाल फेकू नका, असे सांगितल्याचा संशयीत आरोपी उमेश पाटील यास राग आला. त्याने होमगार्ड कोळी यांच्या अंगावर गुलाल फेकला, गुलाल का फेकला? याचा जाब विचारल्यावर आरोपी उमेश होमगार्ड कोळी यांच्यावर धावून आला तसेच राहुल पाटीलही त्याच्या मदतीसाठी सरसावल्याने दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.


कॉपी करू नका.