भुसावळ शहरात अनधिकृत फलकांचा बोलबाला


पालिकेकडून कारवाईची अपेक्षा : शहर विद्रुपीकरण करणारे फलक हटवण्याची मागणी

भुसावळ : शहरात सर्वदूर शुभेच्छा फलक लावण्यात आले असून या फलकांसाठी पालिकेची कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही तर दुसरीकडे पालिकेकडूनही या फलक लावणार्‍यांवर कारवाई होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे पालिकेचे आर्थिक नुकसानदेखील होत आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी करुणा डहाळे यांनी या संदर्भात गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, भुसावळातील शांतता समितीच्या बैठकीत भाईंच्या पोस्टरची चर्चा झाल्यानंतर ‘ते’ फलक आता हटवण्यात आले आहेत.

अनधिकृत फलकांचा बोलबाला
भुसावळ शहरातील जामनेर रोड, यावल रोड तसेच शहरातील विविध भागात पालिकेच्या खांबावर तसेच मिळेल त्या जागेवर विविध जाहिरातदार तसेच नेत्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लावण्यात आले आहे. फलक लावल्यानंतर अनेक दिवस हे फलक कायम असल्याने वाहनधारकांचे यामुळे लक्ष विचलीत होवून अपघात घडण्याची भीतीदेखील वर्तवली जात आहे. कारवाई करण्याची जवाबदारी पालिकेची असताना यंत्रणा मात्र सुस्त आहे. या संदर्भात पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी पालिकेला या फलकांबाबत पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.

मुख्याधिकारी म्हणाल्या कारवाई करणार
मुख्याधिकारी करुणा डहाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या की, अनधिकृत फलकांबाबत माहिती घेवून निश्‍चित कारवाई करू, असेही त्या म्हणाल्या.


कॉपी करू नका.