जानवे अपघात : आई-वडिलांपाठोपाठ चिमुकल्याचाही ओढवला मृत्यू
अमळनेर : गरोदरी पत्नीला दवाखान्यात तपासणीसाठी नेल्यानंतर परतीच्या प्रवासात तालुक्यातील जानवे गावाजवळ भरधाव चारचाकीने धडक दिल्याने चारचाकी चालक असलेल्या अनिल वाघ व त्यांच्या पत्नी सोनाली यांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर या अपघातातून बचावलेला मात्र गंभीर जखमी असलेला प्रियांश अनिल वाघ (7) याच्यावर नाशिक येथे उपचार सुरू असताना मंगळवारी दुपारी त्याचीही प्राणज्योत मालवली. प्रियांशच्या दोन्ही पायांना जबर दुखापत झाल्याने त्यास सुरवातीला धुळे येथे हलवण्यात आलेे. प्रकृती अधिकच खालावल्याने त्यास नाशिक येथे खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले होते.