जळगावात तुरूंगाधिकार्‍यांवरच कैद्यांनी केला हल्ला


पैशांची मागणी करताना भांडण सोडवण्यास गेलेले किरण पवार जखमी

जळगाव- दोन कैद्यांचे भांडण सोडविण्यास गेलेल्या तुरुंगसधिकारी किरण संतोष पवार यांच्यावरच सचिन दशरथ सैंदाणे (30) या कैद्याने लोखंडी पट्टीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहात घडली. या घटनेत तुरुंगाधिकारी पवार यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर कैदी सचिन सैंदाणे याने स्वतःचे डोके फोडून घेतले. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न झाले, मात्र त्याने नकार दिल्याचे कारागृह प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पैशांच्या मागणीनुसार कैद्यांमध्ये भांडण
शनिपेठ पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक तसेच आर्म अ‍ॅक्टच्या गुन्ह्यात सचिन दशरथ सैंदाणे हा न्यायालयीन कोठडीत असून 3 ऑक्टोंबर 2016 पासून तो कारागृहात आहे तर महेश उर्फ डेम्या वासुदेव पाटील (20) हा तालुका पोलीस ठाण्यात दाखल प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असून पाच दिवसांपूर्वीच तो कारागृहात आला. सचिन हा गेल्या काही दिवसांपासून कुठलेही कारण नसतांना महेशला पाच हजार रुपयांची मागणी करत होता मात्र महेशने त्याला नकार दिला. मात्र सचिनने महेशला पैशांसाठी तगादा लावून ठेवला. त्यावरुन त्यांच्यामध्ये वाद टोकाला गेले. भांडण सोडवण्यासाठी गेलेले तुरुंगाधिकारी किरण संतोष पवार यांच्यावर सचिनने लोखंडी पट्टीने वार केल्यानंतर त्यांच्या उजव्या हाताला मनगटाजवळ नस कापली जावून दुखापत झाली.


कॉपी करू नका.