जिल्ह्यातील 71 संशयीतांवर लवकरच हद्दपारीची कारवाई


जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले : गुन्हेगारांना पाठबळ देणारेही रडारवर

जळगाव : गेल्या तीन वर्षात जिल्ह्यातून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या 74 उपद्रवींना हद्दपार करण्यात आले असून आणखी 71 जणांवर हद्दपारीची कारवाई सुरू असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी मंगळवारी पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, उपद्रवी गुन्हेगारी टोळ्यांची माहिती जमा केली जात असून लवकरच या टोळ्यांवरही हद्दपारी होईल शिवाय या गुन्हेगारांना आर्थिक पाठबळ देणारे तसेच प्रत्यक्ष किंवा पदड्यामागचेही रडारवर असल्याचे ते म्हणाले. अधीक्षकांच्या दालनात झालेल्या पत्रकार परीषदेवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहम यांची उपस्थिती होती.

डी.जे.मॉडिफाईड : भुसावळात कारवाई
डी.जे.चालक बेकाशदेशीरपणे विना परवाना वाहने मॉडीफाईड करत असल्याचे समोर आल्याने भुसावळात सोमवारी आठ वाहने जप्त करून ती आरटीओ विभागाच्या ताब्यात कायदेशीर कारवाई करण्यासाठी देण्यात आली. जल्हाभरासह इतर जिल्ह्यातील पोलीस स्टेशन, पोलीस दूरक्षेत्र यांनाही सुचना करण्यात आल्या असून जिल्ह्यात अशी वाहने आढळल्यास तत्काळ कळविण्याचे सांगण्यात आले असल्याचेही डॉ. पंजाबराव उगले यांनी यावेळी सांगितले.

सोशल मिडीयावर अफवा पसरल्यास खबरदार !
सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाती धर्माच्या भावना दुखविले जाणारे संदेश पसरविले जातात. अशा प्रकारे संदेश पसरविणार्‍यांवर पोलिस विभागाची करडी नजर असून अशाप्रकारे जाती धर्माच्या भावना दुखवणारे व्हीडीओ किंवा छायाचित्र पसरवतील, प्रसारीत करतील, लाईक, शेअर किंवा त्यावर कॉमेंट करतील, अशा कुणाचीही गय केली जाणार नसून त्यांच्या माहिती तंत्रज्ञान कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी पोलीस अधीक्षकांनी सांगितले.

लवकरच 71 संशयीतांवर हद्दपारीची कारवाई
गेल्या दोन वर्षात म्हणजे 2017 मध्ये 12 तर 2018 मध्ये 13 तर 2019 मध्ये 49 जणांवर हद्दपारीची कारवाई झाली. यावर्षी तडीपार करण्यात आलेल्या मध्येही 49 मध्ये 12 जण हे जळगाव शहरातील आहेत तसेच 71 जणांवरही हद्दपारीची कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी डॉ.उगले म्हणाले.


कॉपी करू नका.