भुसावळात तीन ठिकाणी चोर्या : दहा हजारांचा ऐवज लांबवला
भुसावळ- शहरातील नारायण नगरातील रहिवासी व सेवानिवृत्त पोलिस हवालदार सुधाकर विसपुते यांच्या घरासह मोरेश्वर नगरात महिलेच्या घरी चोरी केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आल्याने शहरात पुन्हा खळबळ उडाली. शहर वाहतूक शाखेतून निवृत्त झालेले हवालदार सुधाकर सोनू विसपुते यांच्या घराच्या मागील बाजूने येत चोरट्यांनी घराची खिडकीतून आत हात घालत विसपुते यांच्या पॅण्टच्या पाकिटातून एक हजार 500 रुपये तर त्यांच्या पत्नीच्या पर्समधून 625 रुपये मिळून दोन हजार 125 रुपये लांबवत कपडे तेथेच फेकले. त्यानंतर नारायण नगराच्या बाजूला असलेल्या मोरेश्वर नगरातील रहिवासी सुरेखा कैलास न्हावकर यांच्या घराची खिडकी उघडून घरातील खिडकीजवळ ठेवलेला मोबाईल बुधवारी पहाटे लांबवण्यात आला. याच पद्धत्तीने सीताराम नगरातूनही याच पध्दतीने एका घरातील खिडकी उघडून पाकीट लांबवण्यात आले. त्यात एटीएम कार्ड, ओळखपत्र व 270 रुपये लांबवले. एकूण नऊ हजार 822 रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.