गिरड मध्यवर्ती बँकेत तिजोरी न फुटल्याने लाखो वाचले


जळगाव : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गिरड शाखेचे चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने जितोरी न फुटल्याने लाखो वाचले. बुधवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. गिरड गावात जवाहर हायस्कूलजवळ जिल्हा बँकेची शाखा असून चोरट्यांनी कुलूप तोडत प्रवेश केला. तिजोरी फोडण्यासाठी वापरलेले दगड व इतर साहित्याचा वापर करण्यात आला मात्र सुदैवाने तिजोरी न फुटल्याने तिजोरीतील चार लाख 80 हजार रुपये वाचले. शाखाधिकारी बोरसे यांच्या फिर्यादीनुसार भडगाव पोलिसात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.