रावेर तालुक्यात सर्दी-खोकल्यासोबत तापाच्या रुग्णात वाढ


ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची वाढली गर्दी

रावेर- रावेर शहरासह परीसरात सर्दी-खोकल्यासोबत तापाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली असून ग्रामीण रुग्णालयात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे.

ग्रामीण रुग्णालयात वाढली रुग्णांची गर्दी
रावेर शहरातील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी वाढली आहे. त्यात सर्दी-खोकला-पडसे तसेच तापाच्या रुग्णांचा समावेश आहे. दररोज हजारापर्यंत रुग्णांची ओपीडी वाढली असून अनेकदा रांगेत नंबर लावण्यावर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये वादंगदेखील होताना दिसून येत आहे. परीणामी रुग्णालयात डॉक्टरांसह नर्ससंख्या वाढवावी, अशी अपेक्षा आहे. दरम्यान, वातावरणातील बदलाने रुग्णसंख्या वाढली असून अनेकांना डोकेदुखी, कंबर दुखणे, ताप येणे आदी त्रास जाणवत असून नागरीकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी केले आहे. शहरासह गाव-खेड्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असल्याने खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असून काही डॉक्टरांसह आरोग्य सेविका तातडीने उपचार करीत असलेतरी काही मात्र रुग्णांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रुग्णांकडून केला जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांनी द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.