मुंबईत संततधार : अप-डाऊन मार्गावरील 22 रेल्वे गाड्या रद्द


प्रवाशांची प्रचंड गैरसोय : अनेक गाड्यांच्या मार्गात बदल

भुसावळ- मुंबईतील पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सोमवारी देखील भुसावळ विभागातून अप व डाऊन मार्गावरील 22 गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सोसावा लागत आहे.

22 रेल्वेगाड्या रद्दने गैरसोय
पावसामुळे सोमवारी 12859 डाऊन मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस, 12534 डाऊन मुंबई-लखनऊ पुष्पक एक्सप्रेस, 14313 डाऊन लोकमान्य तिलक टर्मिनस बरेली एक्सप्रेस, 12165 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस वाराणसी एक्सप्रेस, 12139 डाऊन मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस, 12110 व 12109 अप डाऊन मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, 22102 व 22101 अप-डाऊन मुंबई मनमाड राज्यराणी एक्सप्रेस, 11094 अप वाराणसी-मुंबई महानगरी एक्सप्रेस, 12168 अप वाराणसी लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस, 11058 अप अमृतसर मुंबई पठाणकोट एक्सप्रेस, 11062 अप दरभंगा लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्सप्रेस, 11016 अप गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस कुशीनगर एक्सप्रेस, 11056 अप गोरखपूर लोकमान्य टिळक टर्मिनस गोदान एक्सप्रेस, 12142 अप पाटलीपूत्र लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस, 12112 अप अमरावती मुंबई एक्सप्रेस, 51154 व 51153 अप डाऊन भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 12335 अप भागलपूर लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्सप्रेस,12322 डाऊन मुंबई हावडा वाया अलाहाबाद, 12101 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनस अंजनी एक्सप्रेस आदी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.


कॉपी करू नका.