मुंबईत संततधार : दुसर्या दिवशीही आठ रेल्वे गाड्या रद्द

रेल्वे प्रवाशांची गैरसोय : पाच गाड्या शॉर्ट टर्मिनेट : तीन गाड्या उशिराने
भुसावळ : मुंबईतील पावसाने मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले असून दुसर्या दिवशी गुरुवारीदेखील सहा रेल्वे गाड्या रद्द करण्यात आली तर पाच गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात येवून त्या विभागातून सोडण्यात आल्या तसेच तीन गाड्या उशिराने धावत असल्याने रेल्वे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. दरम्यान, शुक्रवारी डाऊन छपरा एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.
गुरुवारी आठ गाड्या रद्द
12118 व 12117 अप-डाउन मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोदावरी एक्स्प्रेस, 12110 अप-डाउन मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस, 17617 डाउन मुंबई-नांदेड तपोवन एक्सप्रेस, 22222 अप हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी एक्सप्रेस, 12072 अप जालना-दादर जनशताब्दी एक्सप्रेस तसेच 11093 मुंबई-वाराणसी महानगरी एक्सप्रेस रद्द करण्यात आली. दरम्यान, शुक्रवार, 6 रोजी 15102 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स छपरा एक्सप्रेस प्रारंभिक स्टेशन से दिनांक 06.09.19 को रद्द करण्यात आली.
गुरुवारी तीन गाड्या धावताय उशिराने
प्रारंभिक स्टेशनपासून 11061 लोकमान्य टिळक टर्मिनल्स पवन एक्स्प्रेस गुरुवारी 12.15 ऐवजी 5.25 वाजता सोडण्यात आली. 11071 लोकमान्य टिळक टर्मिनल्स वाराणसी कामायनी एक्सप्रेस 11.40 ऐवजी दुपारी साडेचार वाजता सोडण्यात आली. 12171 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स हरीद्वार एक्सप्रेस 7.55 ऐवजी दुपारी 4.40 वाजता सोडण्यात आली.
पाच गाड्या शॉर्ट टर्मिनेट
गुरुवारी 12336 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स भागलपूर एक्सप्रेस नाशिक ते भागलपूर चालवण्यात आली. 15017 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर एक्सप्रेस इगतपूरी से गोरखपूर चालवण्यात आली. 12542 डाउन लोकमान्य टिळक टर्मिनल्स गोरखपूर एक्सप्रेस चाळीसगाव से गोरखपूर चालवण्यात आली. 17057 मुंबई-सिकंदराबाद एक्सप्रेस मनमाड ते सिकंदराबाद चालवण्यात आली.




