रावेरात रविवारी टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी

भुसावळ- महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची 17 वी 14 व 19 वर्षाआतील मुला-मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा दोंडाईचा येथे13 ते 15 सप्टेंबरदरम्यान होत आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी रविवार, 8 रोजी सकाळी 10 वाजता रावेर शहरातील सरदार जी.जी.शाळेच्या मैदानावर होत आहे.
14 वर्षांकरीता 1 ऑक्टोबर 2005 व 19 वर्षाकरीता 2000 नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव वासेफ पटेल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रावेरचे तालुका क्रीडा समन्वयक ए.पी.पाटील, मुख्याध्यापक शिरीष वाणी, क्रीडा शिक्षक टी.बी.महाजन, जे.के.पाटील, उन्मेष पाटील व प्रतीक कुलकर्णी यांनी केले आहे.