भुसावळात 10 रोजी लेवा समाजातील गुणवंतांचा गौरव


भुसावळ : अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघातर्फे लेवा पाटीदार समाजातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड व भुसावळ तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा 24 वा गुणगौरव समारंभ मंगळवार, 10 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.बी.व्ही.खाचणे, हॉल टिंबर मार्केट येथे होत आहे. या कार्यक्रमात समाजातील दहावी, बारावी, स्कॉलरशीप तसेच विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते होणार आहे.

यांची कार्यक्रमास राहणार उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबप्रमुख रमेश विठू पाटील असतील. प्रमुख पाहुणे समाजाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, नामदार हरीभाऊ जावळे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, आमदार राजूा भोळे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, माजी आमदार नीळकंठ फालक, माजी आमदार शिरीष चौधरी, नाहाटा महाविद्यालयाचे चेअरमन महेश फालक, मसाका चेअरमन शरद महाजन, झुंजार लेवाचे अध्यक्ष अरुण पाटील व आदी मान्यवर उपस्थित राहतील. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन अखिल भारतीय लेवा संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश पाटील, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवा वाणी, शाम भारंबे, रुपेश चौधरी आदी कार्यकर्त्यांनी केले आहे.


कॉपी करू नका.