भुसावळात जय गणेश फाऊंडेशनच्या रंगभरण स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद


भुसावळ- शहरातील जय गणेश फाऊंडेशन नवसाचा गणपती उत्सव मंडळातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा रविवारी घेण्यात आली. स्पर्धेत शहरातील विविध शाळांतील सुमारे 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. ‘परीसर स्वच्छता’ या विषयावर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धा यशस्विततेसाठी चैत्राम पवार, मनोज चौधरी, शरद लोहार, सुमित यावलकर, हर्षल वानखेडे, राहुल भावसेकर यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.