भुसावळातील गावठी कट्टा प्रकरण : पसार आरोपी जाळ्यात


भुसावळ- शहरातील 72 खोली भागात दोन संशयित जबरी चोरीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर 31 जुलै 2019 रोजी रात्री 12.35 वाजेच्या सुमारास आरोपी विशाल राजू टाक (19, रा.जामनेर रोड, तीन नंबर पोलीस चौकीसमोर, वाल्मीक नगर, भुसावळ) यास अटक करण्यात आली होती. आरोपीच्या ताब्यातून पाच हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्टल व एक हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले होते मात्र आरोपीचा साथीदार यशवंत राजपूत हा अंधाराचा फायदा घेत पसार झाला होता.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
गुन्ह्यातील पसार आरोपी यशवंत गुणवंत राजपूत (रा.शिवपूर कन्हाळा) हा सोमवारी भुसावळातील नाहा चौफुलीजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, शंकर पाटील, नाईक रमण सुरळकर, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, ईश्‍वर भालेराव आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.