खेळातून घडू शकते उत्तम करीयर -आमदार संजय सावकारे


भुसावळ शहरातील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये तालुका मैदानी स्पर्धा उत्साहात

भुसावळ- महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग व बियाणी मिलिटरी स्कूलच्या संयुक्त विद्यमाने भुसावळ तालुका मैदाणी स्पर्धा नुकत्याच बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावर झाल्या. उद्घाटन आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते झाले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरीक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्रदीप साखरे, समन्वयक बी.एन.पाटील, रमण भोळेंसह तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

इतर व्यसनांऐवजी खेळाचे व्यसन लावा -आमदार
विद्यार्थ्यांनी इतर व्यसन लावून घेण्यापेक्षा खेळाचे व्यसन लावावे, डॉक्टर इंजिनीयर बनूनच करीयर करता येते, असे नव्हे तर खेळाडूही खेळातून आपले करीअर करू शकतात, अभ्यासाइतकेच खेळाला महत्त्व देणे गरजेचे आहे कारण खेळामुळे आपले शरीर व मन हे तंदुरुस्त राहते. भुसावळ शहर हे पूर्वीपासूनच खेळामध्ये जिल्ह्यात अग्रगण्य होते. तेच वैभव आपण टिकवून ठेवले पाहिजे, अशी खेळाडूंकडून अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

असा आहे स्पर्धेचा निकाल
14, 17 व 19 वयोगटात स्पर्धा झाल्या. 14 वर्षे वयोगटात 100 मीटर धावणे प्रथम- तुषार चिंचोली, द्वितीय- विनोद बारेला, तृतीय- सुरज परदेशी. 200 मीटर धावणे, प्रथम- प्रणव चौधरी, द्वितीय- विजय बारेला, तृतीय – तुषार पाठवले, 400 मीटर धावणे, प्रथम- लखन मोहिते, द्वितीय- आयुब कापुरे, तृतीय- ओम. 600 मीटर धावणे, प्रथम- कल्पेश चौधरी, द्वितीय- प्रणव भालेराव, तृतीय- प्रवीण मोहिते. 80 मीटर डान्स , प्रथम- अमेय सुरवाडे, द्वितीय- राकेश पारधी, तृतीय- चैतन्य सोनवणे. लांब उडी, प्रथम- तुषार चिंचोली, द्वितीय- अंबादास मोहिते, तृतीय- आकाश जाधव. उंच उडी, प्रथम- आकाश जाधव, द्वितीय- अमोल बेलघर, तृतीय- करण बोबडे. गोळा फेक- प्रथम- क्रिश गुड्डू जाधव, द्वितीय- आकाश जाधव, तृतीय- ओम बिराडे, थाळीफेक स्पर्धा- प्रथम- वामन शिंदे, द्वितीय- आकाश जाधव, तृतीय- लखन मोहिते.

यांनी घेतले परीश्रम
एम.के.वाणी, आर.बी.पाटील, प्रा.मनोज वारके, बाविस्कर, राणे, बोरसे, नेमाडे, बोरसे, विलास पाटील, कोळी, बियाणी स्कूलचे हिंमत पाटील यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.