भुसावळात शिक्षकांनी काळ्या फिती लावून संपास दिला पाठिंबा


भुसावळ : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय राज्यव्यापी संपाला भुसावळ तालुक्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांनी काळ्या फिती लावून पाठिंबा दिला. सोमवार, 9 रोजी खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महासंघ भुसावळ तालुका संघटनेच्या नेतृत्वात तालुक्यातील 20 खाजगी प्राथमिक शाळेतील 200 शिक्षकांनी काळ्या फिती लावून काम केल्याची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश लोखंडे यांनी दिली.

तालुक्यातील या शाळांनी दिला संपास पाठिंबा
भुसावळ शहरातील श्री र.न मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिर, वासंती महाजन प्राथमिक विद्यालय, तु.स. झोपे विद्यालय, भागीरथी प्राथमिक विद्यालय, रेल्वे नॉर्थ कॉलनी, स्व.सौ.सुशिलाबाई नामदेव फालक प्राथमिक विद्यालय, भालचंद्र धोंडू पाटील प्राथमिक विद्यामंदिर, जिजामाता प्राथमिक विद्यामंदिर, भुसावळ, सेंट अलॉयसिस मराठी प्राथमिक शाळा, श्री गाडगेबाबा प्राथमिक विद्यामंदिर, सु.छ.चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, प.क.कोटेचा प्राथमिक विद्या मंदिर, विवेकानंद प्राथमिक विद्यामंदिर, स्व. कृ.पा.पाटील प्राथमिक विद्यामंदिर तर तालुक्यातील श्री शारदा प्राथमिक विद्यामंदिर, दीपनगर, जिजामाई प्राथमिक विद्यामंदिर, खडके, प्रतिभा पाटील प्राथमिक विद्यामंदिर, कंडारी, च.ह.बढे प्राथमिक विद्यामंदिर, वरणगाव, इंदिरा गांधी प्राथमिक विद्यामंदिर, साकेगाव, सु.रा.कदम प्राथमिक विद्यामंदिर, वरणगाव या शाळांनी संपास पाठिंबा दिला.


कॉपी करू नका.