जळगावातील अॅड.विजय पाटील यांना अटक
नूतन मराठा प्रकरणात कारवाई : अटकेने शहरात खळबळ
जळगाव : शहरातील नामांकीत नूतन मराठा महाविद्यालयात 2018 मध्ये झालेल्या वादातून परस्परविरोधी गटाविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी मंगळवारी सकाळी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अॅड.विजय पाटील यांना अटक केली. या कारवाईने जळगावातील राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.