भुसावळात 14 रोजी ‘तंत्रज्ञानाच्या युगात हरवलेले बालपण’ विषयावर वक्तृत्व स्पर्धा
भुसावळ : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ भुसावळ संचलित तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरात सुप्रसिद्ध थोर साहित्यिक स्व.बाबासाहेब केनारखेडे स्मृतीमहोत्सव 2019 अंतर्गत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘तंत्रज्ञानाच्या युगात हरवलेले बालपण’या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत् स्पर्धेचे शनिवार, 14 रोजी सकाळी नऊ वाजता तु.स.झोपे प्राथमिक विद्यामंदिरात आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा विनामूल्य प्रथम व द्वितीय विजयी स्पर्धकांना विशेष पारीरतोषिक व प्रशस्तीपत्र देवून गौरवण्यात येणार असून सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. वक्तृत्व हिंदी वा इंग्रजी भाषेत असावे तसेच प्रत्येक शाळेतील केवळ दोन विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असून तीन ते पाच मिनिटात त्यांनी सादरीकरण करावयाचे आहे. अधिक माहितीसाठी मुख्याध्यापिका छाया बळीराम चौधरी (9766069474) व राहुल शशिकांत भारंबे (9021610697) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.