ईटारसी पॅसेंजरमधील जखमी प्रवाशाचा अखेर मृत्यू
भुसावळ : अप इटारसी पॅसेंजर रेल्वे यार्डात उभी असताना कोचिंग कॉम्प्लेक्समध्ये 55 वर्षीय प्रवासी जखमी अवस्थेत 24 ऑगस्ट रोजी आढळला होता. त्यास उपचारार्थ जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा 9 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. उंची 5.5, नाक सरळ, रंग काळा, शरीर बांधा सडपातळ, डोक्याचे काळे-पांढरे, चेहरा लांबट, मुछ काळी-पांढरी, दाढी वाढलेली पांढरी, अंगात आकाशी रंगाचा फुलबाहीचा शर्ट व आकाशी रंगाचा पायजामा असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार एस.डी.पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.