आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंसह अनेक नेते नजरकैदेत
हैदराबाद : ‘चलो आत्मकूर’ आंदोलनात सहभागी झाल्याने आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासह त्यांचा मुलगा नारा लोकेश आणि टीडीपी नेत्यांसही नजरकैदेत ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वृत्तसंस्था एएनआयने दिली आहे. देलगू देसम पक्षाच्यावतीने ‘चलो आत्मकुर’ रॅली काढण्यात येत आहे.