लोणला दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
अमळनेर : तालुक्यातील लोण बुद्रुक गावातील रहिवासी व दहावीत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्याने गावाजवळील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. मयूर रवींद्र पाटील (16) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.