बदनामीकारक फलक लावणार्यांचा फैजपूरात निषेध
दोषींवर कठोर कारवाई करण्याची पोलिस प्रशासनाकडे मागणी
फैजपूर- केळी संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष तथा आमदार हरीभाऊ जावळे व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या संदर्भात मानहानीकारक बॅनर्स लावणार्यांचा भाजपा पदाधिकार्यांनी निषेध व्यक्त करीत पोलिस प्रशासनास कारवाई संदर्भात निवेदन दिले. सुज्ञ नागरीकांनी समाजविघातक प्रवृत्तींचा जाहीर निषेध केला आहे. फैजपूरसह ठिकठिकाणी हेतुपूर्वक राजकीय व सामाजिक बदनामी करण्याच्या सुडबुद्धिने बॅनरबाजी करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले असून निवेदनाची प्रंत फैजपूरचे मुख्याधिकारी व प्रांताधिकारी यांनाही देण्यात आली.
यांची निवेदनावर नावे
भाजपा प्रदेश सदस्य तथा माजी नगराध्यक्ष बी.के.काका चौधरी, जिल्हा दुध संचालक नगरसेवक हेमराज चौधरी, नगरपालिका भाजपा गटनेते मिलिंद वाघुळदे, नगरसेवक देवेंद्र बेंडाळे, देवेंद्र साळी, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस नरेंद्र नारखेडे, काँग्रेस जिल्हा चिटणीस केतन किरंगे, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, माजी नगरसेवक शेख जफर, शेख जलील, मेहबूब पिंजारी, भाजपा तालुका उपाध्यक्ष नितीन नेमाडे, काँग्रेस शहराध्यक्ष शेख रीयाज शेख साबीर, भाजपा शहराध्यक्ष संजय रल, सरचिटणीस संजय सराफ, उपाध्यक्ष अनंता नेहते, समाजसेवक रवींद्र होले, जितेंद्र भारंबे, पप्पू चौधरी, राजेश महाजन, सुनील दुसाने, सुनील जैन, जितेंद्र वर्मा, देवेंद्र झोपे, भाजपा महिला तालुका उपाध्यक्ष संगीता चौधरी, शहराध्यक्ष जयश्री चौधरी, मोहिनी पाटील, दीपाली झोपे यांच्यासह भाजपा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.