राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटन सचिवपदी वंदना चौधरी
जामनेर- कळमसरा, ता.पाचोरा येथील रहिवासी वंदना अशोक चौधरी यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश संघटन सचिवपदी नुकतीच पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, महिला राष्ट्रीय अध्यक्षा माजी मंत्री फौजिया खान, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. चौधरी यांची नुकतीच छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षपदीही निवड झाली आहे. त्या शेंदुर्णी जिनींगचे संचालक अशोक चौधरी यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या निवडीबद्दल त्यांच्याव सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, वंदना चौधरी या जामनेर विधानसभा क्षेत्रातून उमेदवारीसाठी इच्छुक असून पक्षपातळीवर त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.