बोदवडमध्ये डंपरचे ब्रेकफेल ; अपघातात दोघे जखमी
डिव्हायरवर डंपर धडकल्यानंतर उलटला ; चालक पार
बोदवड- ब्रेक फेल झाल्याने भरधाव डंपर दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले. मंगळवारी दुपारी साडेतीन वाजता हा अपघात झाला. अपघातानंतर चालक पसार झाला. जामनेर रस्त्याकडून बोदवडकडे येणारा डंपर (एम.एच.21 डी 9800) चे ब्रेक फेल झाल्याने चालकाने जुन्या तहसीलजवळील डिव्हायरला धडक दिली. या घटनेत डंपरचे पुढील चाके व पाट्या बाहेर येवून वाहन उलटले तर याचवेळी दुचाकी (एम.एच. 19 बी.के. 5913) वरून भागवत सोनार (3.5 रा.बोदवड) हा तरुण वाहनाखाली दबले गेल्याने गंभीर झाला तर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या देवकाबाई बंडू सपकाळ (50, शेलवड) या जखमी झाल्या. डॉ.सागर पाटील यांनी सोनार यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवले तर सपकाळ यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांनाही जळगाावी हलवण्यात आले. या अपघातानंतर डंपर चालक पसार झाला. रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद नव्हती.