नाशकात तिघा गणेशभक्तांना जलसमाधी : पाच जण बचावले
नाशिक : श्री विसर्जनासाठी नदीपात्रात उतरलेले तीन गणेशभक्त बुडाल्याची घटना नाशिकमधील गंगापूर येथील सोमेश्वर धबधबा येथे घडली. या घटनेतील पाच गणेशभक्तांना सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांना यश आले. दरम्यान,
रामकुंडाजवळ संत गाडगे महाराज पुलाखाली प्रशांत पाटील (38) या युवकाने गोदावरीत बाप्पाला निरोप देताना सूर लगावला मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो गटांगळ्या खाऊ लागताच अग्निशमन व जीवरक्षक दलाच्या जवानांनी त्यास वाचवले.