मालेगावात तरुणाचा खून : सहा आरोपींना अटक


मालेगाव : शहरातील कमरुद्दीन उर्फ अमिन गोली समसुद्दिन कुरेशी (20, रा.सलामताबाद, मालेगाव) या तरुणाच्या हत्येप्रकरणी पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून त्यातील एक पसार झाला आहे. याप्र करणी शहेनाज बानो समसुद्दीन कुरेशी (40) रा. सलामताबाद मालेगाव हिने फिर्याद दिली आहे.

सहा आरोपींच्या आवळल्या मुसक्या
संशयीत आरोपींनी कल्लू स्टेडीयमजवळ अमीन गोली यास पकडून ठेवत न त्याच्या डोक्यावर, मानेवर तसेच शरीरवर ठिकठिकाणी वार करून जीवे ठार मारले. या प्रकरणी इस्तेयाक अब्दुल गफुर खान (रा.सलामताबाद), वसीम शेख युनुस (रा.नुमानीनगर), शोएब शेख मूकसूद (रा.मोहनबाबानगर), शेख असीफ मकसुद (रा. सनाउल्ला नगर), शाबुद्दिन शेख रईस (रा.सलामताबाद), सलमान खान जाकिर खान (रा.नुमानीनगर) यांना अटक करण्यात आली तर नईम (रा.आझादनगर) पसार झाला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, पोलीस उपअधिक्षक रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कमरुद्दीनला येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले यावेळी डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्याने आरोपींचा माग घेण्यास मदत झाली.


कॉपी करू नका.