जळगावासह प्रिंप्राळ्यातील तिघे संशयीत जाळ्यात


घरफोडीचा उलगडा ; रामानंद पोलिसांनी एलईडी केला जप्त

जळगाव- रामानंद नगर पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात जळगावसह पिंप्राळ्यातील तिघा चोरट्यांचा मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून दहा हजार रुपये किंमतीचा एलईडी जप्त करण्यात आला आहे. इरफान युसूफ पठाण (22), शरीफ शेख शफी उर्फ फैय्याज (22, दोन्ही रा.खंडेराव नगर, जळगाव), शोएब शेख युनूस (20, रा.आझाद नगर, पिंप्राळा) अशी अटकेतील आरोपींची नाव आहेत.

घरफोडीचा गुन्ह्यात अट
खंडेराव नगरातील सगीर देशमुख हे बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी 74 हजारांचा ऐवज लांबवला होता. 10 जुलै रोजी ही घटना उघडकीस आल्यानंतर रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल होता. पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, रवी नरवाडे, भूषण पाटील, अतुल पवार , संतोष पाटील आदींच्या पथकाने मंगळवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.