भुसावळात सहा जुगारी पोलिसांच्या जाळ्यात


भुसावळ- शहरातील दगडी पुला वळील राहुल नगर भागात झन्ना-मन्ना खेळणार्‍या सहा जुगार्‍यांवर बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केल्याने जुगार्‍यांमध्ये खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
आरोपींच्या ताब्यातून एक हजार 140 रुपयांची रोकड तसेच पत्ता-जुगाराची साधने जप्त करण्यात आली.
अटकेतील आरोपींमध्ये संजय बुधा इंगळे (42, रा.चिखली, ता.यावल),
डिगंबर शहादु काकडे (30, रा.राजुरा, ता.यावल), विजय मनोहर महाजन (57, रा.भालोद, ता.यावल), समाधान सुरेश तायडे (27, रा.सांगवी खुर्द , ता.यावल), एकनाथ नीळकंठ इंगळे (29, रा.चिखली, ता.यावल), मोहन लक्ष्मण बर्‍हाटे (36, रा.न्यु एरीया वॉर्ड, भुसावळ) यांचा समावेश आहे.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठचे निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठचे हवालदार शंकर पाटील, पोलिस नाईक दीपक जाधव, कृष्णा देशमुख, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, सचिन पोळ, मंदार महाजन आदींच्या पथकाने कारवाई केली. तपास नाईक दीपक जाधव करीत आहेत.


कॉपी करू नका.