पथराडच्या बेपत्ता तरुणाचा अखेर मृतदेह गवसला


धरणगाव : तालुक्यातील 23 वर्षीय बेपत्ता तरुणाचा मृतदेह शनिवारी कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. अतुल आबा महाडिक (23) असे मृत तरुणाचे नाव असून तो गेल्या सहा दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. याबाबत आप्तांनी तो बेपत्ता झाल्याने पोलिसात हरवल्याची नोंदही केली होती. शनिवारी दुपारी साडेतीच्या दरम्यान गावाजवळ एका शेतात मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली. ग्रामस्थांच्या पाहणीत हा मृतदेह अतुलचाच असल्याचे निष्पन्न झाले तर प्राण्यांनी हातपाय कुरतडल्याचे दिसून आले. या घटनेमुळे गावात खळबळ निर्माण झाली असून ही हत्या की आत्महत्या ? असा प्रश्न आहे.
दरम्यान, अतुल हा पाळधी येथे एका कंपनीत कामाला जात असल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.