अल-कायदाचा म्होरक्या हमजा बिन लादेन ठार


वॉशिंग्टन : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल-कायदाचा म्होरक्या हमजा बिन लादेन ठार झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. हमजा बिन लादेन हा ओसामा बिन लादेनचा मुलगा होता. अल कायदा या दहशतवादी संघटनेचा तो म्होरक्या होता. ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्याच्या वृत्ताला डोनाल्ड ट्रम्प यांनी दुजोरा दिला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. हमजा बिन लादेन ठार झाला असल्याची गोपनीय माहिती अमेरीकेला मिळाली असल्याचे एनबीसी न्यूजने 2 ऑगस्ट रोजी सांगितले होते. गेल्या दोन वर्षांपासून सुरु असलेल्या कारवाईत हमजा बिन लादेनचा खात्मा करण्यात आल्याचा पुरावा अमेरिकेला मिळाल्याचं एका अधिकार्‍याने सीएनएनला तेव्हा सांगितलं होतं. आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून हमजा बिन लादेनला ठार करण्यात आल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केलं आहे.

तिसर्‍या पत्नीचा पंधरावा मुलगा हमजा
2 ऑगस्टला जेव्हा हमजा बिन लादेनचा खात्मा झाल का? असा प्रश्न अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला नव्हता. तसेच हे वृत्त फेटाळूनही लावले नव्हते मात्र त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हमजा हा ओसामाच्या 20 मुलांपैकी तिसर्‍या पत्नीचा 15 वा मुलगा असून तो 30 वर्षांचा आहे. ओसामा बिन लादेन याला ठार केल्यानंतर अल-कायदाची सूत्रे त्याच्याकडे होती.


कॉपी करू नका.