मीरा-भाईदर आयुक्तालयाच्या निर्मितीबाबत शासनाने अध्यादेश काढले
मुंबई – मीरा-भाईदर भागातील नव्या पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेबाबत राज्य सरकारने अखेर शुक्रवारी अध्यादेश जारी केले. वाढती लोकसंख्या शिवय गुन्ह्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून पहिले आयुक्त म्हणून कोणत्या अधिकार्यांची नियुक्ती केली जाते? याकडे आता अधिकार्यांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यापैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याबाबत उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तपदासाठी अंमलदार-अधिकार्यांच्या अडीअडचणी समजून घेणारा, प्रामाणिक, निष्कलंक अधिकार्यांची नियुक्ती व्हावी, अशी अपेक्षा आहे.