भुसावळकरांना दोन दिवस उशिराने होणार पाणीपुरवठा


जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफार्मर जळाल्याने रोटेशन बिघडले

भुसावळ- पालिकेतील तापी नगराील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठा करणारा ट्रान्सफार्मर शुक्रवारी 11 वाजेच्या सुमारास जळाल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. किमान दोन दिवसांनी आता शहराचा पाणीपुरवठा पुढे ढकलण्यात आल्याने भर पावसाळ्यात नागरीकांचे पाण्यासाठी हाल होणार आहेत. नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा व पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष रमण भोळे व मुख्याधिकारी करुणा डहाळे तसेच पाणी.पुरवठा सभापती महेंद्रसिंग ठाकूर यांनी केले आहे.


कॉपी करू नका.