जळगावात श्री विसर्जनादरम्यान दोन गणेश भक्तांच्या दुचाकी लांबवल्या
जळगाव- शहरासह जिल्हयात गुरुवारी श्रींचे विसर्जन झाले. यादरम्यान विसर्जन मिरवणुकीत दंग गणेशभक्तांच्या दोन दुचाकी लांबविल्याच्या घटना शनिवारी समोर आल्या आहे. एका दुचाकीची नेहरु चौक आयडीबाय बँकेच्या एटीएमजवळून तर दुसर्या दुचाकीची गोलाणी मार्केट जुनी शिरपूर बँकेजवळून चोरी झाली.
पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार
शहरातील कोल्हे नगरात अशोक गिरधर चौधरी हे कुटुंबासह राहतात. ते जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतून सेवानिवृत्त झालेले आहे. त्यांचा मुलगा भुषण अशोक चौधरी हा गणेश विसर्जन मिरवणुक पाहण्यासाठी 12 रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास शहरात आला. यावेळी त्याने त्यांची पांढर्या रंगाची अॅक्टीवा दुचाकी (क्र एम.एच. 19 बीडब्लू 9140) ही गोलाणी मार्केटजवळील जुन्या शिरपूर बँकेजवळ रस्त्यालगत उभी केली. मिरवणुक बघून परतले असता त्यांना जागेवर त्यांची दुचाकी दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला, यानंतर तक्रारीसाठी शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
मंडळात नाचायला गेला अन चोरट्यांनी साधली संधी
शिवाजीनगर हुडको परीसरात चंद्रकात गजानन बोदवडे वय 27 हा तरुण वास्तव्यास आहे. 12 रोजी विसर्जन असल्याने त्यांचे शिवाजीनगर मित्र मंडळ विसर्जन मिरवुणकीत सहभागी झाले होते. या मंडळात नाचण्यासाठी चंदक्रात शहरात आला. यावेळी चंद्रकांतने त्याची दुचाकी (एम.एच.19 सी.जी.3567) ही खान्देश कॉम्लेक्स परिसरातील आयडीबीआय बँकेच्या एटीएएमजवळ उभी केली. दुपारी 3.30 वाजता मंडळ नेहरु चौकात पोहचले असता, याठिकाणी चंद्रकात मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाचण्यासाठी गेला. नाचून झाल्यावर पुन्हा दुचाकी लावलेल्या ठिकाणी आला असता तोपर्यंत चोरट्यांनी दुचाकी लांबवली.