अनोळखी इसमाची ओळख पटवण्याचे आवाहन


भुसावळ- भुसावळ रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक सातवर 23 रोजी रात्री 10 वाजता 30 वर्षीय इसम बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आल्यानंतर उपचार सुरू असताना 5 रोजी त्याचा मृत्यू झाला. उंची पाच फूट चार इंच, रंग निमगोरा, शरीर बांधा सडपतळ, डोक्याचे केस काळे, दाढी बारीक, नाक सरळ, डोळे मोठे असे अनोळखीचे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक श्रीकृष्ण निकम यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


कॉपी करू नका.